कविता

**प्राजक्त ...
एक सुंदर चारोळी....

'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'

              अर्थात....फुलंच ती.... इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ?
'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ?
मला नाही तसं वाटत ! 'रितं' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही.
तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....
फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड
करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं.
जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...
आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये.
म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो ..
ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.
                     आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर ? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण खुलवायला...फुलवायला... नव्याने सज्ज व्हायचं.
फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचं.

जमेल का, असं 'प्राजक्त' व्हायला ?

(टीप : सादर केलेला लेख कोणत्या लेखकाने लिहिला आहे हे माहित नाही , मला तो खूप आवडला, त्यामुळे मी तो तुमच्या समोर सादर केला आहे, तुम्हालाही आवडला*






रात्र


रात्र ही चांदण्यांची भरुनी आलेय आभाळी
जणू चांदोमामाच्या घरी आज आलेय दिवाळी
              शांत निरव रात्री हवा चाललेय अशी
             स्वतःच्याच धुंदीत रमून वेडावलेय जशी
रात किडेही जागे होती किरकिर करूनी गाणी गाती
लुकलुकणाऱ्या त्या प्रकाशने रात्रराणीचा शृंगार करती
            प्राणीपक्षी झोपून जाती स्वप्नांमध्ये रंगून जाती
            रात्रीच्या त्या कुशीमध्ये स्वतःलाच झोकून देती
न्हाऊनी निघती काया तीची सावळी
तरीही ती त्या चांदण्यांना तीच कशी भावली
           असो ती सवळी तरीही दिसे साजरी
           खुलून तीच रूप तो अजूनच दिसे गोजिरी
काजवे आणि पाकोळ्या येतात तिच्या दारी
ताऱ्यांसोबत तिची भलतीच आहे यारी
          अशीही रात्र पाहुनी असे वाटते, जग नवे निर्माण झाले
          पाहूनी हा नजारा मन माझेही तृप्त झाले

टिप्पण्या